शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मनपा माध्यमिक शाळांमध्ये मानधनावर शिक्षक भरती

By admin | Updated: June 8, 2017 18:17 IST

उर्दू-मराठी माध्यम : स्थायीच्या निर्णयानुसार कार्यवाही

नाशिक : महापालिकेत सरळ सेवेने कुठल्याही प्रकारच्या नोकर भरतीस बंदी असल्याने स्थायी समितीच्या अधिकारात सहा महिन्यांच्या कालावधीकरिता मनपाच्या ४ अनुदानित तर ९ विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची २१ रिक्त पदे भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सद्यस्थितीत संबंधित शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या जास्त असतानाही त्यातुलनेत शिक्षक उपलब्ध नसल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.महापालिकेच्या मराठी माध्यमिक विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील १७ शिक्षकांची पदे तसेच उर्दू माध्यम अनुदानित माध्यमिक शाळांमधील ४ शिक्षकांची पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाने स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला होता. महापालिकेने माध्यमिक शाळा उघडल्या परंतु, शिक्षकांच्या नेमणुकीबाबत अनास्थाच दाखविली गेली. सद्यस्थितीत संबंधित शाळांमध्ये चांगल्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या आहे, परंतु शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने एका शिक्षकावरच अतिरिक्त ताण येत आहे. शासनाने महापालिकेत नोकर भरतीस मनाई केली असल्याने मानधनावर शिक्षक भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मागील महिन्यात स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यानुसार, माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. सदर पदे ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार असून, मासिक ८ हजार रुपये मानधन असणार आहे. दरम्यान, शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मानधनावर का होईना शिक्षक भरतीसाठी बेरोजगारांकडून विचारणा सुरू झाली आहे.