नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मागीलवर्षी देण्यात आलेली प्रोत्साहनपर रक्कम नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष शासनाने काढला असून, तसे उत्तर विद्यापीठाला पाठविले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली रक्कम विद्यापीठ पुन्हा वसूल करण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही ठाम भूमिका घेतली नसून नेहमीप्रमाणेच हा पेच व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना इतर कोणतेही लाभ मिळत नाहीत तरीही कर्मचारी जादा तास काम करतात. या कर्मचाऱ्यांना निदान दिवाळीत तरी जादा कामाचा मोबदला देण्यात यावा यासाठी मागीलवर्षी विद्यापीठात मोठे आंदोलन झाले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाचे कामकाजही खोळंबले होते. अखेर हा प्रश्न व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे दोन वर्षांचे २४ हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनादेखील थोड्याफार प्रमाणात आर्थिक लाभ देण्यात आला होता. परंतु असा निर्णय घेताना विद्यापीठाने प्रोत्साहन अग्रीम कोणत्या नियमात आणि निकषात देता येणे शक्य आहे याबाबतचा अभिप्राय शासनाकडे मागितला होता. त्यानुसार मागील महिन्यात विद्यापीठाकडे शासनाने उत्तर पाठविले. त्यानुसार असे प्रोत्साहन अग्रीम देता येत नसल्याचे त्यात म्हटले आहे. शासनाच्या या पत्रामुळे कर्मचाऱ्यांना देऊ केलेली रक्कम वसूल केली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली असताना, विद्यापीठाने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सदर प्रश्न येत्या १तारखेला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला आहे. यासंदर्भातील निर्णय पुन्हा एकदा परिषदेसमोर ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बाजूने व्यवस्थापन परिषदेने निर्णय घ्यावा यासाठी दबावदेखील आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अध्यापक विद्यालयाचा देवीहट्टी येथे कार्यक्रम चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्माचर्याश्रम संचलित सौ. लीलाबाई दलुभाऊ जैन अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापकांनी रेणुकानगर जिल्हा परिषद शाळा देवीहट्टी येथे विविध कार्यक्रम घेतले.तेथे वस्तीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी मेडिकल कॉलेजच्या डॉ. प्रिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. पुणे येथील पोस्टमास्टर श्रीमती विजया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापक सौ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर).
विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून ‘त्या’ रकमेची होणार वसुली
By admin | Updated: July 18, 2014 00:35 IST