शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वसुली घटूनही कर्जवाटपात आठशे कोटींनी वाढ

By admin | Updated: August 6, 2016 00:39 IST

जिल्हा बॅँक : ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण

 नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप कर्ज वाटपात तब्बल ८९४ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकेच नव्हे, तर शासन निर्णयानुसार ३१ जुलै अखेर सुमारे सात हजार सभासदांच्या ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे लोखंडी तिजोरी खरेदी, सीसीटीव्ही खरेदी, नोकर भरतीसह अन्य कारणांनी बॅँकेची आर्थिक स्थिती काहीशी डळमळीत झालेली असताना आणि मागील वर्षाच्या दुष्काळामुळे कर्जवसुलीवर प्रतिकूल परिणाम झालेला असताना यावर्षी खरिपाच्या कर्ज वाटपात जिल्हा बॅँकेने सढळ हाताने कर्ज दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह नगदी पिके काढण्याकडे कल वाढविला आहे. सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात ३० जून २०१५ अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एक लाख ४२ हजार ३१८ सभासदांना ७८३ कोटी ४४ लाख ८० हजारांचे कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत यावर्षी दोन लाख २८ हजार ७९८ सभासदांना १६७७ कोटी ७९ लाख ९८ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८६ हजार ४८० जास्त सभासदांना ८९४ कोटी ३५ लाख १८ हजार जास्तीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅँकेने यंदा चांगला पाऊस झाल्याने खरिपासाठी चांगले कर्ज वाटप केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी हाच कर्ज वाटपाचा आकडा २२०० ते २३०० कोटींच्या घरात पोहोचला होता; मात्र आता कर्जाचा आलेख १६७७ कोटींपर्यंत खाली उतरला आहे. (प्रतिनिधी)