शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

लाभार्थीकडून रक्कम वसूल करा

By admin | Updated: November 12, 2016 00:10 IST

तक्रार निवारण मंचचा आदेश : जुन्या विहिरीवर घेतला नवीन विहिरीचा लाभ

 येवला : पंचायत समितीच्या शासकीय अधिकाऱ्याच्या संगनमताने खोटी कागदपत्रे बनवून उताऱ्याच्या नोंदीत फेरफार करत हवे तसे उतारे बनवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाची फसवणूक करत जुन्या विहिरीवरच नवीन विहीर असल्याचे दाखवून लाभ घेतला. या प्रकरणी नाशिक जिल्हा तक्रार निवारणचे प्राधिकारी मनोहर बच्छाव यांनी संबंधित लाभार्थीकडून दोन लाख ७८ हजार १९४ रुपयाची रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधित विस्तार अधिकाऱ्याचा मनरेगाचा पदभार काढण्यासह जबाबदार शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे.देवळाणे येथील बाळनाथ भीमा गोसावी या शेतकऱ्याने जुनी विहीर नवीन असल्याचे दाखवून संगनमताने लाभ उचलल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जालिंदर गोसावी यांनी तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणी तक्रार निवारण प्राधिकारी यांनी दिलेल्या निर्णयात लाभार्थी बाळनाथ गोसावी यांच्याकडून दोन लाख ७८ हजार १९४ रु पये वसूल करावेत. तसेच ग्रामरोजगार सेवक कांतिलाल जाधव, तलाठी, तत्कालीन ग्रामसेवक विनोद बनसोडे, हल्ली कार्यरत असलेले ग्रामसेवक संदीप कत्तूरवार, तांत्रिक अधिकारी पंकज नगराळे, विस्तार अधिकारी आनंद यादव यांच्यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश तक्र ार निवारण प्राधिकारी यांनी दिले आहेत. याशिवाय विस्तार अधिकारी यादव यांच्याकडील कारभार तत्काळ काढून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय तत्कालीन गटविकास अधिकारी जोशी यांना सक्त ताकीद देऊन सध्याचे गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी मनरेगाच्या तक्रारी निकाली काढताना वस्तुस्थितीची शहानिशा करण्याची दक्षता घ्यावी, असा लेखी आदेश दिला. या प्रकरणाच्या निकालामुळे येवला पंचायत समितीत आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो असे म्हणण्याची वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)