शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

जुन्या सार्वजनिक शौचालयांची नव्याने उभारणी पालिकेकडून फेरनिविदा : सुमारे तीन कोटी रुपयांची कामे

By admin | Updated: June 2, 2014 00:34 IST

नाशिक : शहरातील काही उपनगरांसह झोपडप˜्यांमधील जुनी झालेली सार्वजनिक शौचालये तोडून त्याठिकाणी नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी महानगरपालिकेने फेर ई-निविदा काढल्या असून, सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या सार्वजनिक शौचालयांमुळे त्या-त्या परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नाशिक : शहरातील काही उपनगरांसह झोपडप˜्यांमधील जुनी झालेली सार्वजनिक शौचालये तोडून त्याठिकाणी नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी महानगरपालिकेने फेर ई-निविदा काढल्या असून, सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या सार्वजनिक शौचालयांमुळे त्या-त्या परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शहरात अनेक उपनगरांसह झोपडप˜्यांमध्ये महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. परंतु अनेक शौचालयांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, भांडी फुटलेली आहेत, पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील नागरिक बाहेरच प्रातर्विधी उरकत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. विशेषत: महिलावर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असते. महापालिकेने सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेसाठी जुन्या शौचालयांची पाहणी करून त्यांच्या जागेवर नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील समतानगर येथे डीपीरोडजवळील जुने शौचालय तोडून नवीन महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच पूर्व विभागातीलच प्रभाग क्रमांक ३१ मधील आंबेडकरवाडी येथे जुने शौचालय तोडून नव्याने २० सिट्सचे शौचालय उभारण्यात येणार आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ५८ मध्ये राजवाडा येथील जुने शौचालय तोडून नवीन शौचालय बांधण्यात येणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २० मध्ये संगम चौक स्वारबाबानगर येथील जुने सार्वजनिक शौचालय तोडून त्याच जागेत नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्रभाग ५० मधील महादेववाडी येथे २० सिट्सचे नवीन सुलभ शौचालय, प्रभाग २१ मधील संत कबीरनगर जांगीर बाबा चौक येथे सार्वजनिक शौचालय, पूर्व विभागातील प्रभाग ४० मधील शिवाजीवाडी येथे नासर्डीलगत १० सिट्सचे दोन शौचालय, पंचवटीतील प्रभाग ९ मधील सम्राटनगर गौडवाडी येथे मनपा शाळेलगत सार्वजनिक शौचालय, प्रभाग २४ मधील उंटवाडीरोड क्रांतीनगर झोपडप˜ीत नवीन सुलभ शौचालय, प्रभाग १० मधील वाघाडी नदीलगत वाल्मीकनगर, श्रीराम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालय, प्रभाग २२ मधील सिद्धार्थनगर येथे शौचालय, प्रभाग २१ मधील संत कबीरनगर येथे सार्वजनिक शौचालय, सातपूर विभागात चुंचाळे येथील कोळीवाडा १२ सिट्सचे सार्वजनिक शौचालय, तर प्रभाग ४५ मध्ये पंडितनगर येथे १० सिट्सचे सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. शौचालयांच्या दुरवस्थेस नागरिकच जबाबदारमहापालिकेमार्फत झोपडप˜ी परिसरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते; परंतु या शौचालयांचे दरवाजे, खिडक्या काढून नेल्या जातात. शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देऊनही परिसरातील नागरिक शौचालयाबाहेरच नैसर्गिक विधी उरकत असल्याने अस्वच्छता वाढीस लागते. शौचालयांची भांडीही फोडली जातात. पाण्याचा वापर अन्य कामांसाठी केला जातो. त्यामुळे पालिकेकडूनही देखभाल-दुरुस्तीबाबत पुढाकार घेतला जात नाही. परिसरातील सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य जपण्याचे काम परिसरातील नागरिकांच्याच हाती असताना आपल्या गैरकृत्यातून काही समाजकंटक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू पाहत आहेत.