शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

By admin | Updated: September 2, 2016 00:22 IST

जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

 नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध विभागांच्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांपैकी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यातील सात कोटींच्या कामांना येत्या बुधवारी (दि.७) पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पूर्व व पश्चिम विभागाला प्रत्येकी साडेतीन कोटींची कामे सूचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने लघुपाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी त्यांच्या नऊ तालुक्यांतील सर्व शाखा अभियंता व उपअभियंत्यांना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सहभागी गावांमधील पाझरतलाव, गावतळे, कोटाबंधारे यांच्या दुरुस्त्या, जलस्त्रोत बळकटीकरण तसेच नवीन कामांबाबतचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे प्रस्ताव प्राप्त होताच त्यापैकी साडेतीन कोटींच्या प्रस्तावांना बुधवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.त्यादृष्टीने अद्यापही लघुपाटबंधारे पूर्व विभागाची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. त्यांना मागील वर्षीच्या जिल्हा परिषद सेसमधील १ कोटी २२ लाखांच्या कामांना अद्याप सर्वसाधारण सभेची मान्यता घेता आलेली नाही. त्यामुळे त्यांचा यावर्षीचा सेसचा निधी खर्च होण्याबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे पश्चिम विभागांतर्गत ३५ कोटी ३६ लाखांची जलयुक्त शिवार योजनेची एकूण २५८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यात खासगी उद्योग समूह तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) निधीतून ४४ लाखांची इगतपुरी तालुक्यात पाच तर दिंडोरी तालुक्यात चार अशी एकूण नऊ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)