शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव नदीजोड प्रकल्प अहवालास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:29 IST

दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ टीएमसी अतिरिक्त पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे.

नाशिक : दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ टीएमसी अतिरिक्त पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे.  दमणगंगा-एकदरे या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. राष्टय जलविकास अभीकरणाने तयार केलेल्या पूर्व व्यवहार्यतानुसार या योजनेचे लाभव्यय गुणोत्तर १.४४ इतके आहे. सदर योजनेतून १०० दलघमी पाणी सिंचनासाठी व ४३ दलघमी पाणी बिगरसिंचन प्रयोजनार्थ उपलब्ध होऊ शकते. या योजनेंतर्गत एक धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. गंगापूर धरणाशी बोगद्याद्वारे वा पाइपलाइनद्वारे जोडण्याचे नियोजन असून, १४३ दलघमी पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोºयात वळविण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने दमणगंगा-एकदरे नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी १७ कोटी ७४ लाख १८ हजार रुपये मंजूर केले आहेत. अपर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविण्यात येणार आहे. या योजनेचे दोन पर्याय देण्यात आले असून, लाभव्यय गुणोत्तर १ करिता १.६५ व पर्याय २ करिता १.६४ इतके येते. सदर योजनेतून सुमारे २८.३२० हेक्टर सिंचनाचा लाभ मिळू शकतो. तसेच १३७.०१ दलघमी पाणी बिगरसिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते.  या योजनेंतर्गत पाच धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. ही धरणे एकमेकांशी जोडण्यात येणार असून, २०२ दलघमी पाणी उपसा पद्धतीने उचलून गोदावरीवरील खोºयातील देव नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी २३ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या नदीजोड प्रकल्पांना राष्टय प्रकल्प म्हणून जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिलेली आहे.नाशिक-सिन्नरचा पाणीप्रश्न सुटणारया दोन्हीही नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खोºयात १२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिन्नर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचाच सुटणार आहे. याबरोबरच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरला लागणारे २.६ टीएमसी पाणी सहज उपलब्ध होणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे शिर्डी आणि जायकवाडीलाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे खासदार हेमंत गोडसे व राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :riverनदी