शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

करोना महासंकट निवारणासाठी भक्तामर स्तोत्र पठण फलदायी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:44 IST

देवळाली कॅम्प : सर्व विश्वावर आलेले करोना विषाणूचे संकट निरसन करण्यासाठी महाप्रभावक व महामंत्र असलेल्या 'भक्तामर स्तोत्र ' पठण करणे फलदायी असून प्रत्येकाने या स्तोत्राचे नियमित पठण करावे असे आवाहन संकल्पमूर्ती महासतीजी प.पु मधुस्मिताजी महाराज साहेब यांनी केले.

ठळक मुद्देजैन महासतीजी प. पु. मधुस्मिताजी यांचे आवाहन 

देवळाली कॅम्प : सर्व विश्वावर आलेले करोना विषाणूचे संकट निरसन करण्यासाठी महाप्रभावक व महामंत्र असलेल्या 'भक्तामर स्तोत्र ' पठण करणे फलदायी असून प्रत्येकाने या स्तोत्राचे नियमित पठण करावे असे आवाहन संकल्पमूर्ती महासतीजी प.पु मधुस्मिताजी महाराज साहेब यांनी केले.लामरोड येथील विरायतन सोसायटीमध्ये या वैश्विक संकटाच्या निवारणासाठी प.पु मधुस्मिताजी यांसह साध्वीश्री भावप्रीतिजी, विद्या जैन, श्रीनिवास जैन आदींसह या ४८ स्तोत्रांचे नियमित 'मधुमाधवी' रागात अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. या भक्तामर स्त्रोत्रांची रचना उज्जैन येथे आचार्यमुनी पुंगव मानतुंगस्वामी यांनी सातव्या शतकात शुद्ध संस्कृत भाषेत तर मंदाक्रांत वृत्तात व वसंत तिलका छंदात केली आहे. या पौराणिक महत्त्व असलेल्या भक्तामर स्त्रोत्राच्या पठणाचे अनेक अलौकिक व लौकिक लाभ आहेत. ज्याचे पठण जैन समाजाच्या चारही संप्रदायासह जैनेत्तर भाविक करीत अनुभव घेत असतात. कुठल्याही स्तोत्र आणि मंत्राची सफलता ही साधक साधना आणि साध्य यावर आधारित असते.त्यासाठी श्रद्धा, भक्ती व संकल्प दृढ असणे आवश्यक असते. शुद्ध उच्चारण- पवित्र वातावरण आणि शुद्ध आचरण हे साधनेच्या सिद्धीसाठी आवश्यक आहे. अशा पवित्र वातावरणात या स्तोत्राचे अनुष्ठान सर्व भाविकांनी दररोज सकाळी १० ते १०: ४५ वाजेदरम्यान नियमित करणे आवश्यक आहे. याशिवाय चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रमाच्या प्राचार्या संगीता बाफणा या आपल्या सहकाऱ्यांसह या अनुष्ठानाचे युट्युब व झूम अँपद्वारे नियमित प्रक्षेपण करत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपले जीवन निरोगी व निरामय बनवावे असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले आहे.(फोटो ल्ल२‘ वर)

 

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या