शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:07 IST

दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे.

नाशिक : दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे.यावर्षी ऐन दिवाळीत काळात राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या पार पडल्यामुळे निवडणूकप्रक्रियेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षकांची दिवाळीची सुटी दोन दिवसांनी कमी झाल्याने शिक्षकांनी सुटीचा कालावधी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारपासून (दि. १३) प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणार आहे. परंतु, इंग्रजी शाळांच्या द्वितीय सत्राला नियमितपणे प्रारंभ झाला आहे.त्यानुसार निवडणुकीच्या कामानिमित्त वापरण्यात आलेल्या सुट्या या दिवाळीनंतर अतिरिक्तसुट्या म्हणून देण्यात आल्याने शासकीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा बुधवारपासून सुरू होणार असल्या तरी इंग्रजी शाळा मात्र सोमवारपासूनच गजबजल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र इंग्रजी शाळांचे द्वितीय सत्र सोमवारपासून सुरू झाल्याने शाळांचा परिसर पुन्हा एकदा गजबजला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी काही शाळांना दोन तासच सुट्टी देण्यात आली तर अन्य काही शाळा नियोजित वेळेप्रमाणे सुरू होत्या. दरम्यान, महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळाही बुधवारपासून सुरू होणार आहेत.शाळांना सुटी; शिक्षक मात्र कार्यरतविधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदानघेण्यात आले. अनेक शाळांमध्ये मतदानाचे बूथ लावण्यात आले होते. त्यामुळे शाळांना सुटी असली तरी शिक्षकांना मात्र दि. २० व २१ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी कार्यरत रहावे लागले. मतदानप्रक्रिया व निकाल यामुळे दिवाळीच्या सुटीमध्ये वाढ करून देण्याची मागणी माध्यमिक विभागाच्या शिक्षक व मुख्याध्यापक संघाकडून केली जात होती.

टॅग्स :SchoolशाळाDiwaliदिवाळी