शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेकायदा कामांना विरोध केल्यानेच झगडे यांची बदली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:00 IST

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहीम उघडली होती, त्यामुळेच ही बदली झाल्याचे बोलले जात आहे.

नाशिक : अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहीम उघडली होती, त्यामुळेच ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतिमान कारभाराचा आग्रह धरला व त्यातून महसूल तसेच विकास यंत्रणेच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन त्यांना दप्तर दिरंगाई व बेकायदेशीर कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. काही नाठाळ अधिकाºयांवर त्यांनी कारवाईची शिफारसही केल्याने झगडे यांच्या कामकाजावर अकार्यक्षम अधिकारी नाराज होते. मनमानी कारभार करणारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या बदलीची शिफारस झगडे यांनीच केली होती. जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक, राजकीय हस्तक्षेपास नकार देण्याचे काम झगडे यांनी केल्यामुळेच त्यांची बदली केली गेल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची दोनशे कोटी रुपये किमतीची सुमारे १७५ एकर जमीन परस्पर देवस्थान विश्वस्तांनी बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्याची बाब झगडे यांनी गेल्या आठवड्यात उघडकीस आणून या घोटाळ्याला हातभार लावणारे महसूल विभागातील तहसीलदार, तत्कालीन प्रांत, तलाठी व मंडळ अधिकाºयांसह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत दान केली गेलेली जमीन भूदान समितीच्या सांगण्यावरून महसूल खात्याने परस्पर बांधकाम व्यावसायिकाला कोणताही मोबदला न घेता दिल्याच्या घोटाळ्याची दखल घेत झगडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे काही राजकीय व्यक्ती व बांधकाम व्यावसायिकांच्या दबावामुळेच सरकारने झगडे यांची बदली केल्याची चर्चा होऊ लागली आहे. झगडे यांनी केलेल्या कारवाईचा तडाखा बसलेल्या काही अधिकाºयांनी त्यांची बदली करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते.महिन्यापूर्वीच झगडे यांना पदोन्नतीविभागीय आयुक्त महेश झगडे यांना १ जानेवारी २०१८ रोजी राज्य शासनाने वरिष्ठ वेतनश्रेणीत प्रधान सचिव म्हणून पदोन्नती दिली होती. परंतु झगडे हे नाशिकचे विभागीय आयुक्त असल्यामुळे ते ज्या पदावर आहेत, ते पददेखील प्रधान सचिव दर्जाचे उन्नत करण्यात आले होते. आता त्यांना थेट प्रधान सचिव या पदावरच नेमणूक देण्यात आली आहे. झगडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावरदेखील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, त्यांच्या नेतृत्वात सन २००३-०४ चा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी पार पडला होता.

टॅग्स :commissionerआयुक्त