शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:47 IST

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे.

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे. झाडे जगविण्याचा ध्यास घेतलेल्या एका वृक्षप्रेमीने पंधरा वर्षे शहर व परिसरात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने जाऊन सुरक्षित जागेवर खड्डे खोदून झाडे लावण्याचा विडा उचलला. हे कार्य करताना चार वर्षांपूर्वी या वृक्षप्रेमीच्या डोक्यात एका सुपीक कल्पनेचा जन्म झाला आणि एकाच दिवशी दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट अन् ती जगविण्याचा ध्यास शेखर गायकवाड नावाच्या वृक्षप्रेमीसह शेकडो स्वयंसेवकांनी घेतला. त्यांच्या आपलं पर्यावरण संस्थेने २०१५ साली ‘वनमहोत्सव’ची हाक प्रथम नाशिककरांना दिली. नाशिककरांनी सातपूर भागात आयोजित असा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर दिवसभरात उद्दिष्टापेक्षा एक हजार रोपे अधिक लावली गेली. या उपक्रमाची पुनरावृत्ती संस्थेने २०१६ मध्ये पुन्हा केली आणि लोकसहभागातून सहा हजार पाचशे रोपांची लागवड करून म्हसरू ळ शिवारात वनमहोत्सव साजरा केला.  केवळ झाडे लावली आणि ती रामभरोसे सोडली असे या संस्थेने अजिबात केले नाही तर लावलेल्या सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. २०१५ पासून संस्था सातपूर येथे‘देवराई’ व म्हसरूळला ‘वनराई’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.अशी जगविली रोपेदोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे. लावलेल्या रोपट्यांना वेळोवेळी पाणी, खत देणे, आजूबाजूला वाढलेले गवत कापणे, जाळपट्टा घेऊन वणव्यापासून संरक्षण करणे, रोपट्यांभोवती आळे करून दर आठवड्याला त्यामध्ये पाणी भरणे अशा विविध पद्धतीने संवर्धनाची कामे संस्थेचे हरित सैनिक मागील चार वर्षांपासून करत आहेत.

टॅग्स :environmentवातावरण