शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:21 IST

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले.

ठळक मुद्देसंजीवन समाधी सोहळा : भक्त परिवारातर्फे ज्ञानेश्वरी पारायण

नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हुंडीवाला लेनमधील मंदिरात रविवारी सकाळी गोंदवलेकर महाराज परिवाराच्या वतीने काकड आरती करण्यात आली. अत्यंत तालासुरात झालेल्या माउलींच्या आरतीने आणि पुंडलीक वरदा हारी विठ्ठलच्या गजराने रविवारी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गोंदवलेकर महाराज भक्तपरिवारातील ३००हून अधिक अनुयायी या काकड आरतीप्रसंगी उपस्थित होते. सकाळच्या काकड आरती सोहळ्यापासून सुरू झालेली भाविकांची रीघ रात्रीपर्यंत अखंड सुरू होती.तसेच दि. २५ तारखेपर्यंत बीडच्या अनिताताई चिंचपूरकर यांचे संतचरित्र या विषयावरील कीर्तन रंगत आहे. त्याशिवाय अमृतानुभव पारायण, दशास्कंद भागवत पारायण अर्चना शुक्ल आणि शीला लोंढे यांनी केले. त्याशिवाय शुक्रवारी दासबोध भजनी मंडळाच्या अध्यक्ष जयश्री गुरव आणि सहकाऱ्यांची भजने, शनिवारी रुक्मिणी भजनी मंडळाच्या तुपसाखरे आणि सहकाऱ्यांची तसेच स्वामीनारायण भजनी मंडळाच्या प्रज्ञा गोडसे आणि सहकाºयांची भजने झाली. रविवारी कल्याणी भजनी मंडळाच्या लता जाखडी आणि सहकाºयांची भजने रंगली, तर शुक्रवारी सुवर्णा महाबळ यांचे संतांचा संग हाची स्वर्गवास, शनिवारी सुलभा सायगावकर यांचा हरिपाठाचा अभंग रंगला.त्याशिवाय रविवारी दिंडी सोहळा, समाधी अभंग, आरती आणि महाप्रसाद, गीता पाठ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले, तर सायंकाळी रसिका जोशी-भिडे आणि भक्ती नांदुर्डीकर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी ९.३० वाजता कैलास महाराज वेलजाळी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभसंजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी देवता पूजन आणि पुण्याह वाचन तसेच ज्ञानेश्वरी पारायण आणि महिलांचे भजन असा सोहळा पार पडला.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम