- विवेक कुलकर्णी, अध्यक्ष, लघुउद्योग भारती
---------------------------------------------------
भारताचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सर्वांसाठी पूरक असा अर्थसंकल्प मांडला आहे. कोविड महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना भारतीय अर्थव्यवस्था सांभाळण्याचा व मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅनीफॅक्चरिंगकरिता ७१ हजार कोटी व पायाभूत सुविधांसाठी २० हजार कोटी तसेच आत्मनिर्भरसाठी ६४१८० कोटीची मोठी गुंतवणूक करण्याचा निर्धार केला आहे. यातून उद्योग,कृषी,शेतकरी, कामगार, आरोग्य,शिक्षण,इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रात विकासाची दारे उघडी करण्यात आली आहेत. नाशिक शहरातील मेट्रो सेवेसाठी २ हजार ९२ कोटीच्या तरतुदीमुळे शहराचा व आजूबाजूचा परिसराचा विकास होणार आहे. त्यामुळे रोजगारातही भर पडेल. देशात सात मेगा टेक्स्टाईल्स पार्कच्या घोषणेमुळे विकासाबरोबरच रोजगारालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासही उभारी मिळेल. लघुउद्योजकांना उभारी देण्यासाठी स्टील व अलॉय याचे आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे उद्योगांना चालना व दिलासा मिळणार आहे. वीज वितरण कंपन्यांमधील स्पर्धा वाढणार असून उद्योजकांना पर्याय उपलब्ध होणार आहे, कंपनी कायद्यातील बदल देशाच्या विकासास फायदेशीर ठरतील. स्टार्टअपसाठी एक वर्ष सूट मिळणार आहे, जीएसटी करातील बदल करण्यास मान्यता दर्शवल्यामुळे व करातील बदलांमुळे तसेच रस्ते विकासामुळे अजूनही देशाचा विकास होण्यास मोठा वाव मिळेल. जेष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्यात आलेला आहे. मोठ्या संकटातून देश सावरत असताना सर्व वर्गातील सर्वांसाठी पूरक असा अर्थसंकल्प सादर कलेला दिसत आहे.
- वरुण तलवार,अध्यक्ष आयमा.
------------------------------------------------
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशात सात नवीन मेगा टेक्स्टाईल्स पार्क उभारण्याची घोषणा केल्यामुळे रोजगार निर्मिती बरोबरच कृषी क्षेत्राला उभारी देणारी आहे. लघुउद्योगांना उभारी देताना डिमांड वाढवण्यासाठी अनेक उत्पादनावरील आयात शुल्क वाढवले आहे.तसेच स्टील व आलाँय यांची भाववाढ रोखण्यासाठी आयात शुल्क कमी करून लघुउद्योगाला दिलासा दिलेला आहे. उद्योगासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे वीज डिस्ट्रिब्युशन कंपन्यांना स्पर्धा व्हावी या उद्देशाने दोनपेक्षा अधिक वीजवितरण कंपन्या असतील अशी योजना केली. कंपनी कायद्यातील बदलाबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी विशेष योजना जाहीर केली. एकंदरच कोविड महामारीचे सावट असताना उद्योग, कृषी,शेतकरी,कामगार, आरोग्य,शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी क्षेत्रांना प्रगतीची दारे खुली करुन देणारा अर्थसंकल्प आहे.
- शशिकांत जाधव, माजी अध्यक्ष, निमा
------------------------------------
नाशिक शहराबरोबरच औद्योगिक उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी मेट्रो प्रकल्प योजना राबवावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आम्ही केली होती. ती मागणी या अर्थसंकल्पात पूर्णत्वास येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतकडे वाटचाल आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच उद्योग क्षेत्राच्या खूप अपेक्षा होत्या. परंतु कोविडमुळे या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरीही उद्योग,कृषी,शेतकरी,कामगार, आरोग्य,शिक्षण,इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी क्षेत्रांना प्रगतीची दारे खुली करुन देणारा अर्थसंकल्प आहे.
- संजय महाजन, माजी अध्यक्ष.लघुउद्योग भारती.
----------------------------------------