शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

मूर्ती संकलनातून पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:45 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककर सातत्याने पुढाकार घेत आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग असून, अशीच ‘एक आपलं पर्यावरण’ ही संस्थादेखील मूर्ती संकलनातून पुनर्वापराला चालना देण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून करत आहे. मूर्तींचे एका खड्ड्यात विघटन न करता मूर्तिकारांना संकलित केलेल्या मूर्ती पुनर्वापराच्या निकषावर मोफत देण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककर सातत्याने पुढाकार घेत आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग असून, अशीच ‘एक आपलं पर्यावरण’ ही संस्थादेखील मूर्ती संकलनातून पुनर्वापराला चालना देण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून करत आहे. मूर्तींचे एका खड्ड्यात विघटन न करता मूर्तिकारांना संकलित केलेल्या मूर्ती पुनर्वापराच्या निकषावर मोफत देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आपलं पर्यावरण संस्था वृक्षलागवड व संवर्धनासह पक्षी संवर्धनासाठी शहरासह जिल्ह्यात परिचित आहे; याबरोबरच पर्यावरणपूरक सण-उत्सवाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, हेदेखील संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे २००८ सालापासून संस्थेने अनंत चतुर्दशीला मूर्ती संकलन करण्यास सुरुवात केली. तपोवनातील कपिला रामसृष्टी उद्यानाजवळ संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड व स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केला. पहिल्या वर्षी संकलित झालेल्या मूर्तींचे परिसरातील पडीक विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आले; मात्र २००९-१०पासून पडीक विहिरी संपुष्टात आल्यामुळे संकलित गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे कोठे अन् कसे? हा प्रश्न निर्माण झाला. खड्डा करून पीओपीच्या मूर्ती विसर्जित करत मातीचे प्रदूषण करण्यापेक्षा संकलित मूर्तींचा पुनर्वापर क रण्याची संकल्पना गायकवाड यांना सुचली. त्यानुसार संकलित मूर्ती संबंधित काही मूर्तिकारांना मोफत देण्याचे ठरविले. काहीमूर्तिकारांनी संकलित मूर्ती घेण्यास तयार झाले. मागील आठ वर्षांपासून संस्थेचा मूर्ती संकलनातून पुनर्वापराचा प्रयत्न सुरूच आहे.‘देव जुना होत नाही, तर भावना जुन्या होतात...’ हे पटवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. पुनर्वापराच्या माध्यमातून प्रदूषणाबरोबरच मूर्तींची विटंबना थांबते. तसेच नव्याने बाजारात येणाºया पीओपीला आळा बसतो, असे गायकवाड म्हणाले. नदी, मातीचे प्रदूषण टळण्यास मदत होत असून, गणेशभक्तांचाही या संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे.