शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचे पुन्हा अद्ययावतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:21 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १५ ते २० मे या कालावधीत देशपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १५ ते २० मे या कालावधीत देशपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत.  निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा उपक्रम बाराही महिने सुरू असला तरी, त्याला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळातच मतदारांकडून प्रतिसाद मिळतो. परिणामी मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांबाबत सर्वाधिक तक्रारी केल्या जातात. त्या टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाने मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे नाहीत ती गोळा करण्याचे तसेच ज्यांचे यादीत कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.  परंतु बीएलओ असलेल्या शिक्षकांनी शैक्षणिक परीक्षांचे कारण देत या कामात अनुत्साह दर्शविल्याने त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा एकदा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, दि. १५ ते २० मे या काळात बीएलओंनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराचे मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करावी, यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग यााबाबत असलेल्या त्रुटी दूर करण्याबरोबरच १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक