शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:44 IST

बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोची  २०२१-२२ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या वर्षासाठी अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी नरेश कारडा व कृणाल पाटील, तर मानद सचिव म्हणून गौरव ठक्कर तसेच कोषाध्यक्षपदी हितेश पोतदार  यांचीदेखील निवड करण्यात  आली आहे.

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोची  २०२१-२२ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या वर्षासाठी अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी नरेश कारडा व कृणाल पाटील, तर मानद सचिव म्हणून गौरव ठक्कर तसेच कोषाध्यक्षपदी हितेश पोतदार  यांचीदेखील निवड करण्यात  आली आहे.क्रेडाई नाशिक मेट्रोचे  माजी अध्यक्ष तसेच  राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर  व राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर तसेच अन्य माजी अध्यक्ष यांच्या  समितीने ही निवड केली.गत वर्षात अध्यक्ष रवि महाजन यांच्या नेतृत्वाखाली कोविडच्या संकटकाळात क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शहरामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकांसाठी युनिफाइड डीसीपीआर लागू करण्यात आल्याने त्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमदेखील रवि महाजन यांनी आयोजित केला होता.निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन यांनी विकसित करण्यासाठी शासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच नाशिकमध्ये नवे उद्योग  व  गुंतवणूक  येण्यासाठीदेखील क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेगावकर, सल्लागारपदी ठक्करबांधकाम व्यावसायिकांची देशातील शिखर संस्था क्रेडाईच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून व गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाईच्या श्वेतपत्रिका समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड वर्ष २०२१-२०२३ या कालावधीसाठी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत ही घोषणा करण्यात आली. क्रेडाई नाशिक मेट्रो व क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी या संस्थेसाठी भरीव कार्य केले असून, संघटना वाढीसाठी राज्यभरात क्रेडाईचे अनेक चॅप्टर सुरू केले आहेत. बांधकाम क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय