शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग वर्तुळात आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:43 IST

गेल्या कित्येक दिवसांपासून मोठा उद्योग प्रकल्प नाशिकला येऊ शकलेला नाही. त्यामुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने थेट मुंबईत धडक देऊन मेक इन नाशिक, मॅग्नेटिक नाशिक आणि निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे.

सातपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून मोठा उद्योग प्रकल्प नाशिकला येऊ शकलेला नाही. त्यामुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने थेट मुंबईत धडक देऊन मेक इन नाशिक, मॅग्नेटिक नाशिक आणि निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांना राज्य सरकारकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसला तरी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी) नाशिकला दिलेल्या भेटीत जे काही सकारात्मक संकेत दिले आहेत त्यामुळे उद्योग वर्तुळात आशेचा किरण दिसू लागला आहे. मागील महिन्यात एमआयडीसीचे सहमुख्य अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी नाशिक भेटीत नाशिक जिल्ह्याची विकसन क्षमता मोठी असल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळावी म्हणून राजूर बहुला येथे १४४ हेक्टर जमीन भूसंपदनाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. तसेच दिंडोरी तालुक्यातील तळेगाव आणि अक्र ाळे भूखंडांचे लवकरच वाटप सुरू करण्यात येईल आणि अतिरिक्त ३७२ हेक्टर जमिनीपैकी २०६ हेक्टर जमीन ताब्यात असून, उर्वरित ३२ हेक्टर जमिनीचेदेखील लवकरच संपादन करण्यात येणार असल्याचे सांगितले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनीही नाशिक भेटीत उद्योजकांशी बोलताना सांगितले की, नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह अन्य काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू आहे.जूनअखेरपर्यंत होणार भूखंडांचे वितरणमोठी गुंतवणूक नाशिकमध्ये यावी याकरिता येथील क्षमता, कौशल्य, कामगार, पायाभूत सुविधा आणि माध्यमे यांच्याकडून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे. तळेगाव आक्र ाळे येथे पहिल्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झालेले आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण करून भूखंडांचे वितरण जूनपर्यंत केले जाणार असल्याचे सूतोवाच केले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी