शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिवासी बचाव’तर्फे रावण प्रतिमेची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:26 IST

विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.

ठळक मुद्देविधिवत पूजन : रावणाचे महत्त्व विशद

पंचवटी : विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.दुपारी म्हसरूळ येथील कणसरा चौकातील पटांगणावर महिलांच्या हस्ते रावणाच्या प्रतिमेचे भरतीपूजन व रावण ताटी करण्यात आली. त्यानंतर समस्त आदिवासी बांधवांनी रावण ताटी तसेच पावरी नृत्याचे सादरीकरण करून संचलन केले. आदिवासी समाजात रावणाला राजा मानले जात असल्याने विजयादशमीच्या (दसरा) दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. यावेळी अशोक बागुल यांनी रावणाचे माहात्म्य सांगून रावणाचे पूजन का करावे याबाबतची माहिती विशद केली. आदिवासी समाजात रावणाला देव मानतात त्यामुळे रावणदहन थांबवावे, असा संदेश रावणपूजन करून देण्यात आला. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री धरती माता आरती झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला मयूर बागुल, सुरेंद्र चौरे, किरण बहिरम, देवेन्द्र भरसट, गणेश पवार, नितीन गवळी, सारंग गावित यांच्यासह कणसरा माता मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDasaraदसरा