शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राऊत यांच्या बैठकीला नाराज गटाचा ठेेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:58 IST

शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून, नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्यूहरचनेसंदर्भात बोलावण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला.

नाशिक : शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून, नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्यूहरचनेसंदर्भात बोलावण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. उत्तर महाराष्टचे संपर्कप्रमुख असलेल्या खासदार संजय राऊत यांनी सदरची बैठक बोलावली होती. मात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत सारवासारव करताना बैठकीस नगरसेवकांना बोलावलेच नसल्याचे सांगत शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. दुसरीकडे पक्षातील काही जण हे माध्यमांना हाताशी धरून पक्षाच्या विरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप केल्याने गटबाजीला त्यांच्याकडूनच अप्रत्यक्षरीत्या पुष्टीही मिळाली. खासदार राऊत यांच्या दौऱ्याचे निमंत्रण देतानाच शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे व नवीन पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाचे आयोजन  करण्यात आल्याचे व्हॉट्सअ‍ॅप संदेशात नमूद करण्यात आले होते. माध्यमांनादेखील हीच माहिती देण्यात आली होती. तथापि, बुधवारी (दि. २५) मात्र खासदार राऊत यांनी नगरसेवकांना बोलावलेच नसल्याचा दावा केल्याने नगरसेवक हे लोकप्रतिनिधी नव्हेत काय, असाही प्रश्न शिवसेनेतूनच केला जात आहे. सदरच्या बैठकीसाठी मंगळवारी नगरसेवकांना दूरध्वनी करण्यात आले, त्याचवेळी नगरसेवकांच्या नाराजीमुळे ते बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच. बुधवारी (दि. २५) सकाळी झालेल्या बैठकीस महापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे दुपारी खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी या विषयावरून विचारणा केल्यानंतर त्यांनी ही नगरसेवकांची नव्हे तर केवळ पदाधिकाºयांची बैठक होती, असा दावा केला. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा मतदारसंघ असतो अािण त्याचे निकषही वेगळे असतात. त्यासंदर्भात नगरसेवकांची बैठक स्वतंत्ररीतीने घेतली जाते, असेही ते म्हणाले. विधान परिषदेसाठी पक्षाने नरेंद्र दराडे यांची अधिकृतरीत्या घोेषणा केली आहे. सध्या पक्षाचे २१२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आहेत. मात्र प्रत्यक्षात चारशे मते पक्षाच्या उमेदवाराला मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना