शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतली तरच मिळणार रेशन, सातबारा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 18:48 IST

लोहोणेर : कोरोनाची प्रतिबंधक लस घ्या, नाही तर शासनामार्फत मिळणारे रेशनचे धान्य, सातबारा उतारा, ग्रामपंचायतीकडून मिळणारे कोणतेही शासकीय दाखले तसेच कुठल्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत, असा अनोखा निर्णय देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीने घेतल्याने लसीकरणास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्याने ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

लोहोणेर : कोरोनाची प्रतिबंधक लस घ्या, नाही तर शासनामार्फत मिळणारे रेशनचे धान्य, सातबारा उतारा, ग्रामपंचायतीकडून मिळणारे कोणतेही शासकीय दाखले तसेच कुठल्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत, असा अनोखा निर्णय देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीने घेतल्याने लसीकरणास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्याने ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे गरजेचे असल्याने त्यासाठी विविध उपाययोजनासुद्धा राबवल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा, गावोगावी-घरोघरी जाऊन शिबिराद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र असे असले तरी, प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे अनेक नागरिक कानाडोळा करत लसीकरण करून घेत नसल्याची बाब पुढे आली आहे. यावर उपाय म्हणून देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीने भन्नाट युक्ती करायचे ठरवले आहे.कोरोना प्रतिबंधक लसीचा अद्यापही पहिला डोस तसेच पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठी ठरवून दिलेला कालावधी उलटूनही दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य, तलाठ्यांकडून देण्यात येणारा सातबारा उतारा तसेच ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले, कागदपत्रे आणि योजनांचे लाभ मिळणार नसल्याचा निर्णय नुकताच सावकी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक जे. एस. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला असून, यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी ग्रामसेवक वैशाली पवार, तलाठी कल्याणी कोळी, पोलीसपाटील अश्विनी बच्छाव, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे आदींसह मोठ्या संख्येने सावकी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल