शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात रेशनची आधार जोडणी निम्म्यावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 17:25 IST

शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक जोडून बायोमॅट्रिक पद्धतीने पॉस यंत्राद्वारे रेशनमधून धान्याचे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने काही वर्षांपासून हाती घेतला असून, त्यासाठी अगोदर सर्व नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व नंतर शिधापत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येकाचे आधार क्रमांक गोळा करून ते शिधापत्रिकेशी जोडण्याचे

ठळक मुद्देमोठे आव्हान : मार्चपासून धान्य मिळण्यात अडचणीआधार क्रमांक गोळा करून ते शिधापत्रिकेशी जोडण्याचे काम

नाशिक : राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत आधार जोडणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मार्च महिन्यांपासून रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने फेब्रुवारीअखेर आधार सिडिंगचे काम करण्याचे मोठे आव्हान पुरवठा विभागासमोर उभे ठाकले असून, नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख पात्र शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेता आजपावेतो जेमतेम ५० टक्केच काम झाल्याने मार्चपासून धान्य वितरणात अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक जोडून बायोमॅट्रिक पद्धतीने पॉस यंत्राद्वारे रेशनमधून धान्याचे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने काही वर्षांपासून हाती घेतला असून, त्यासाठी अगोदर सर्व नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व नंतर शिधापत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येकाचे आधार क्रमांक गोळा करून ते शिधापत्रिकेशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून सदरचे काम सुरू असून, त्यात शासनाने वेळोवेळी बदललेले निकष, रेशन दुकानदारांचे असहकार्य, आधार सिडिंग करणा-या खासगी ठेकेदाराची मनमानीमुळे सदरचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. आधार सिडिंग करणारा ठेकेदार दरवेळी बदलत गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांकडून चार ते पाच वेळा आधार क्रमांक गोळा करण्यात आले आहेत. तरीदेखील अजूनही काम पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांच्या काळाबाजाराला आळा बसण्यासाठी मार्च महिन्यापासून अन्न व पुरवठा खात्याने आधार सिडिंग झालेल्यांनाच रेशनवरून धान्य देण्याचे ठरविले आहे.नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, त्यातील जेमतेम ५० टक्के शिधापत्रिकाधारकांच्या आधारची जोडणी झाली असून, राज्यात हेच प्रमाण चौदाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आधार जोडणी पूर्ण करण्याचे आव्हान पुरवठा खात्यापुढे उभे आहे. मात्र शासनाने त्यावरही उतारा शोधला असून, ज्यांच्या आधारची जोडणी अद्याप झालेली नाही अशांसाठी ओळख पटवून रेशन दुकानदाराकडे आपली जोडणी करून घेता येणार आहे. ग्रामीण भागात गावातील सरपंच, पोलीसपाटील, ग्रामसेवक, तलाठी यांची नावे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक पॉसद्वारे सिडिंग करून ज्यांच्याकडे आधार नाही अशांना नॉमिनी करून धान्य वाटप करण्याची मुभा शासनाने दिली आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक असतील, परंतु त्यांची जोडणी झालेली नसेल अशांनी ई-पॉसद्वारे केवायसी सुविधा वापरून त्याची जोडणी करण्याची सोयही करून देण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक