शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार  देणार  विधानभवनाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 14:47 IST

मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

ठळक मुद्देमेळावे, बैठका : रेशन दुकानदारांच्या मोर्चाची जय्यत तयारी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

नाशिक : राज्यातील रेशन दुकानदारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व परवानाधारक तसेच हॉकर्स, किरकोळ केरोसिन परवानाधारकांचा येत्या १९ मार्च रोजी काढण्यात येणा-या मोर्चाची जोरदार तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विभागीय, जिल्हा व तालुकानिहाय रेशन दुकानदारांच्या बैठका, मेळावे घेवून वातावरण निर्मिती केली जात आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी विधानभवनालाच वेढा मारण्याची तयारी रेशन दुकानदारांनी केली आहे.या संदर्भात कळवण येथे मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक वितरण प्रणालीत भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी सरकारी यंत्रणा नेहमीच करत असल्याने ते टाळण्यासाठी राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवाना धारकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, न्या. डी. पी. वधवा समितीने दिलेल्या अहवालानुसार परवानाधारकांना ५६००० रूपये मासिक वेतन द्यावे, तसेच वाढलेल्या महागाईनुसार फरकाची रक्कमही मिळावी, केरोसिनचा कोटा कपात केल्यामुळे विक्रेत्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत असून, शासनाने राज्यातील हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे पुनवर्सन करून त्यांना मानधन देण्यात यावे, केरोसिन परवाना धारकांना अनुदानित गॅस वितरणाचे पुर्ण कामकाज देण्यात यावे, शासनाने राज्यात शिधापत्रिकाधारकांना कोठेही कुठल्याही रास्त धान्य दुकानात धान्य मिळावे म्हणून पोर्टबिलीटीची योजना सुरू केली आहे. त्यामुळे परवानाधारकांवर अन्याय होणार असून, शाासनाने कमीशन वाढ करूनही त्याचा फायदा होणार नाही. ही योजना युद्धपातळीवर राबविणार असेल तर परवानाधारकांना वेतनश्रेणी, शासकीय कर्मचाºयाचादर्जा प्राप्त करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या ११ मार्च रोजी वर्धा येथे राज्यस्तरीय बैठक घेवून त्यात रणनीती ठरविली जाणार आहे. या मेळाव्यास पुण्याचे शहाजी लोखंडे, सोलापुरचे बाबुराव ममाने, जळगावचे जमनादास भाटीया, नगरचे देवीदास देसाई, गणपत डोळसे पाटील, प्रविण जैन, निवृत्ती कापसे, गिरीष कुलकर्णी, परशुरामअहिरे, सुभाष शिरोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक