शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

रेशन दुकानदार राजीनामे देण्याच्या तयारीत

By admin | Updated: June 27, 2017 00:25 IST

रेशन दुकानदारांनी येत्या १ जुलैपासून धान्य न उचलण्याचा निर्णय घेऊन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रेशन दुकानदारांचे थकलेली धान्य पोहोचची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही पदरी काहीच पडत नसल्याचे पाहून नैराश्य आलेल्या रेशन दुकानदारांनी येत्या १ जुलैपासून धान्य न उचलण्याचा निर्णय घेऊन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे. या संदर्भात येत्या २ जुलै रोजी आॅल महाराष्ट्र फेअरप्राइज शॉप किपर फेडरेशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक जळगाव येथे होत असून, तत्पूर्वी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रेशन दुकानदारांच्या बैठका घेऊन त्यांचे मत अजमावून घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात बागलाण तालुक्यापासून केली जाणार आहे. अन्न व पुरवठा खात्याने रेशनवरील अन्नधान्य वाटप करण्यासाठी बायोमॅट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दुकानदारांना लवकरच इपॉस यंत्र वाटप केले जाणार आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचा दावा सरकारी यंत्रणा करीत असली तर, रेशन दुकानदारांनीही या प्रणालीचे स्वागतच केले असल्याचे संघटनेचे नेते निवृत्ती कापसे यांनी म्हटले आहे. परंतु हे करत असताना रेशन दुकानदारांच्या आजवरच्या मागण्यांबाबतही शासनाने आग्रही भूमिका घ्यावयास हवी, असेही त्यांनी सांगितले. रेशन दुकानदारांना दरमहा ३० हजार रुपये मानधन द्यावे, सन २०१४ पासून धान्य पोहोचचे पैसे रेशन दुकानदारांना मिळालेले नाहीत. प्रति क्विंटल ७० रुपयांचा खर्च रेशन दुकानदारांच्या माथी मारण्यात आला आहे, त्याचबरोबर हमालीदेखील शासनाने दिलेली नाही. शासनाकडे या दोन्ही गोष्टींचे लाखो रुपये रेशन दुकानदारांचे थकले आहेत. मालात येणारी घट-तूट दिली जात नाही, रेशन दुकानदारास मदतनीस ठेवण्यासही मज्जाव करण्यात आला असून, लाइट बिल खर्च, गाळा भाडे, स्टेशनरी खर्च आदी बाबी पाहता दुकानदारांना व्यवसाय करणे दिवसेंदिवस अवघड झालेले असताना पुन्हा शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड क्रमांक, बॅँक खाते क्रमांक गोळा करण्याची जबाबदारीही दुकानदारांवर सोपविण्यात आली असून, शासन दररोज नवनवीन फतव्यांच्या आधारे दुकानदारांना वेठीस धरत आहे. या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सामूहिक राजीनामे सादर करण्यापत विचार सुरू झाला आहे.