शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:25 IST

येथे कार्तिक शु. १५ अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे त्र्यंबकेश्वराची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भाविक सहभागी झाले होते.

त्र्यंबकेश्वर : येथे कार्तिक शु. १५ अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे त्र्यंबकेश्वराची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भाविक सहभागी झाले होते.त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहराचे भूषण समजला जाणारा २२ फूट उंचीचा रथ व त्यावर महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी मुखवटा तसेच मूर्तीवर रत्नजडीत मुकुट ठेवून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथोत्सवास सुरुवात करण्यापूर्वी भगवान त्र्यंबकराजाची रत्नजडीत मुकुटासह सवाद्य मिरवणूक कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तेथे त्र्यंबकराजाला स्नान घालत पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक अधिकच रंगली. यावेळी आकर्षक फुले व रोषणाईत रथ अधिक शोभून दिसत होता. रथाच्या अग्रभागी भगवान ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवलेली होती.मिरवणुकीदरम्यान आकर्षक आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे स्वागत व औक्षण केले. संपूर्ण रस्त्याची स्वच्छता सडासंमार्जन करून आकर्षक अशा रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यावरून भगवान त्र्यंबकराजाची मिरवणूक नेण्यात आली. रात्री ८ वाजता दीपमाळ पेटविण्यात आली. तत्पूर्वी दीपमाळेची पूजा पेशव्यांचे उपाध्ये दिलीप कृष्णाजी रुईकर यांनी केली. त्यानंतर मंदिर प्रांगणात आतषबाजी करण्यात आली. सेवाभावी मंडळाकडून मिरवणूक परत आल्यावर पेढे वाटण्यात आले.संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यातच मंदिरापुढील दीपमाळ पेटविल्याने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाले होते. तत्पूर्वी दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैकुंठ चतुर्दशीनिमित्त ज्यांनी देवस्थानला रथ अर्पण केला त्या सरदार विंचूरकरांच्या वतीने महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रांगणात पालखी सोहळा व हरिहर भेटीची पूजा संपन्न झाली. रथाची पूजा करण्यात आली. रथ मिरवणुकीत संपूर्ण गावातील नागरिक, नगराध्यक्ष तृप्ती धारणे, नगरसेवक तसेच विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.