शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दर सूचीचा फटका : पूर्ण निधी मिळतच नसल्याचा दावा नगरसेवक निधीत ‘असाही’ झोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:56 IST

नाशिक : महापौरांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला असला तरी, प्रत्यक्ष कामांची प्राकलने तयार करताना दरसूचीचा फटका बसून मिळालेल्या निधीत कपात होत असल्याचा दावा, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.

ठळक मुद्देसदस्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधीरक्कम पुन्हा निधीत समाविष्ट होत नाही

नाशिक : महापौरांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला असला तरी, प्रत्यक्ष कामांची प्राकलने तयार करताना दरसूचीचा फटका बसून मिळालेल्या निधीत कपात होत असल्याचा दावा, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. ज्या नगरसेवकांचा निधी शिल्लक राहिला असेल, त्यांना तो पुन्हा वापरायास मिळेलच असे नाही. त्यामुळे नगरसेवक निधीचा हा झोल येत्या महासभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे. महापौरांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रत्येक पालिका सदस्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. कायद्याच्या भाषेत हा विकास निधी असला तरी त्याला नगरसेवक निधी म्हणूनच संबोधिले जाते. सदर निधीतून अनेक कामे नगरसेवकांनी सुचविलेली आहेत. परंतु, तांत्रिक बाबींमुळे हा ७५ लाखांचा संपूर्ण निधी सदस्यांना मिळतच नसल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केला आहे. तिदमे यांनी म्हटले आहे, निधी वापरण्यासाठी नगरसेवकांकडून प्राकलन रकमेएवढ्या रकमेचे पत्र घेण्यात येते. प्राकलन तयार करताना डी.एस.आर.रेटचा (जिल्हा दर सूची) संदर्भ घेण्यात येतो. मुळातच हा डी.एस.आर. हा स्थानिक प्रचलित दरांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे बव्हंशी ठेकेदार २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरताना दिसतात. परंतु, नगरसेवकांनी प्राकलन रकमेनुसार दिलेला निधी संपूर्ण खर्च होत नाही. सदर काम ठेकेदाराने कमी दरात घेतले म्हणून उर्वरित रक्कम पुन्हा नगरसेवक निधीत समाविष्ट होत नाही. पालिका सदस्याचा निधी प्राकलन दरानुसारच त्याच्या मिळालेल्या निधीतून कपात होतो. डी.एस.आर. रेट जास्त असल्याने प्राकलन जास्त रकमेचे तयार होऊन त्याचा फटका पालिका सदस्यांना बसत आहे. पालिकेतील १२२ सदस्यांचा नगरसेवक निधी लक्षात घेतल्यास ९१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, डीएसआर रेट अधिक असल्याने प्राकलन जादा दराने बनते आणि नगरसेवक निधीचे पत्रही त्याचनुसार घेतले जाते. मात्र, ठेकेदार काम घेताना २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरतात. सरासरी ३० टक्के म्हटले तरी तरतूद केलेल्या एकूण रकमेतून २५ ते ३० कोटी रुपये खर्च होतच नाही, असा दावाही तिदमे यांनी केला आहे.