शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

कळवण : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ व कळवणचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटीसारख्या दुय्यम प्रश्नांमध्ये व्यस्त आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षांत पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८० रुपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, भारनियमन कमी होताना दिसतनाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य उपाययोजना  आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, भाजपा सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अद्यापही घोळच सुरू आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे व महागाई कमी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जितेंद्र वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण बाजार समितीचे संचालक, शिवसेनेचे गणप्रमुख शीतलकुमार आहिरे, तालुका संघटक संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, विभागप्रमुख अंबादास जाधव, संजय रौंदळ, किशोर पवार, ललित आहेर, सचिन पगार, अप्पा बुटे, विनोद मालपुरे, विनोद भालेराव, किशोर ततार आदी उपस्थित होते.