आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलकांनी स्वत:स अटक करुन घेतली. पोलीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनामुळे गुरूवारचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र शुुकशुकाट होता. पोलीसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. बसेसची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.
झोडगे महामार्गावर रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:10 IST