शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाव-भक्तिगीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:55 IST

श्री गजानन महाराजांची आरती सादर करत विविध भावगीते व भक्तीगीते सादर करून श्रीकांत जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नाशिकरोड : श्री गजानन महाराजांची आरती सादर करत विविध भावगीते व भक्तीगीते सादर करून श्रीकांत जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  दत्तमंदिररोड लायन्स हॉल येथे श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘भावगीते व भक्तीगिते’ या विषयावरील सहावे पुष्प गुंफताना श्रीकांत जोशी यांनी कार्यक्रमाची सुरूवात ‘जय श्री गजानना, सद्गुरू गजानना, भक्तजनाची संकटे, वारिसी दयाधना’ ही स्वरचित आरती सादर करून केली. त्यानंतर गीत रामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ व ‘तोच चंद्रमा नभात’ हे गीत सादर केले. संत ज्ञानोबारायाचा अभंग ‘अधिक देखणे तरी’, पंडित भीमसेन जोशींचे प्रसिद्ध भावगीत गायक कै. अरुण दाते यांना श्रद्धांजली म्हणून ‘भातुकलीच्या खेळामधली’ हे गीत सादर करून उपस्थितांची  वाहवा मिळवली. सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लागू पडणारे ५० वर्षापूर्वींचे बाबूजींचे ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गीताने सद्य  राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली. ‘छेडीली मी आसावरी’, ‘लाजून हसणे अन्’ हे भावगीत उपस्थितांना तारुण्याची आठवण करून देणारे ठरले.१८ वा अध्यायाचा गीतेचा सार ‘कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ’ व ‘जग हे बंदीशाळा’ हे गीत सादर केले. कार्यक्रमाची समाप्ती ‘देव देव्हाऱ्यात नाही’ व ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो’ या भैरवीने झाली. जोशी यांना तबल्यावर साथ श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.  आजचे व्याख्यान,  वक्ते : डॉ. बापूराव देसाई ,  विषय : खान्देशी संस्कृती

टॅग्स :Nashikनाशिक