शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:39 IST

रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे.

पंचवटी : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. पंचवटीत स्वस्त धान्य दुकानातून धान्याची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी स्वस्त धान्य दुकान चालकासह रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने शहरातील सर्व धान्य दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गेल्या दोन वर्षांपासून धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याने धान्याचा काळाबाजार पूर्णत: रोखला गेला असा दावा केला जात असताना पंचवटीतील घटनेने दुकानदारांचे पितळ उघडे पडण्याबरोबरच पुरवठा खात्याचा अनागोंदी कारभारही चर्चेत आला आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पाथरवट लेन येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३२ येथे स्वस्त धान्य दुकानचालक संशयित आरोपी दिनकर गोपाळराव पोटे, रिक्षाचालक मंगेश पांडुरंग उमंग असे दोघेजण स्वस्त धान्य दुकानातील दोन क्विंटल गहू व एक क्विंटल तांदूळ असे सहा हजार रुपयांचे धान्य काळाबाजारात विक्रीच्या उद्देशाने रिक्षातून घेऊन जात असताना त्याचदरम्यान पुरवठा निरीक्षक रोहिदास अंबादास भालसिंग हे त्या भागातून जात होते. त्यांनी सदरचा प्रकार पाहिल्यावर तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी दुकानदार व रिक्षाचालक अशा दोघांना ताब्यात घेऊन सहा हजार रुपये किमतीचे तीन क्विंटल गहू व तांदूळ जप्त केले. या प्रकरणी पुरवठा निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.रेशनच्या धान्याच्या काळाबाजाराची घटना उघडकीस येताच, पुरवठा विभागाने शहरातील सर्व दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार दिनकर पोटे यांच्या दुकानातील कागदपत्रे, दप्तर ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली जात आहे. ई पॉस प्रणालीने किती धान्य वाटप होते व मॅन्युएली किती धान्य वाटप होते याची माहिती गोळा करण्यात येत आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागNashikनाशिक