मुल्हेर -आजच्या आधुनिक युगात ध्वनिक्षेपकांवरची गाणी आणि दांडिया यासारख्या मनोरंजन आणि संस्कृती जोपासण्याचा दावा करणारे अनेक कार्यक्रम युवापिढीला खेचत असताना ३७५ वर्षांपूर्वीची परंपरा सांभाळणारी मुल्हेर येथील रासक्रीडा येत्या बुधवारी रोजी साजरी होत आहे.सामाजिक महत्त्व रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना वाटून दिलेली आहेत आणि ती आजपर्यंत आपापली परंपरा सांभाळून आहेत. जसे रासमंडलसाठी लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणणे हे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे, तर रासमंडल विणणे व देव सांभाळणे हे शिंपी समाजाकडे, रासाच्या चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळणे हे काम मराठा समाजाकडे, दिवाबत्तीची सोय करणे तेली समाजाकडे आणि भजन परंपरा सांभाळणे हे काम ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात.रासचक्राची रचना सुमारे २८ फूट व्यासाचे रासाचे चाक केळीची पाने, झेंडूची फुले लावून सजविली जातात आणि त्यालाच रासमंडळ म्हणतात. हे चक्र १४ फूट उंची असणाऱ्या रासस्तंभावर संपातकाळी चढवले जाते आणि यंदा संपातकाळ (चंद्र व सूर्य यांच्या साक्षीने) ६.०७ मिनिटांचा मुहूर्त आहे. यावेळी जमलेले भाविक श्री उद्धव महाराज की जय या नामघोषात चक्र रासस्तंभावर चढवितात.
मुल्हेर येथील रासक्रीडा
By admin | Updated: October 7, 2014 00:08 IST