शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रासाका बचाव समितीचे साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:02 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील रासाका साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निविदा काढावी आणि कारखाना सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याप्रमुख मागणीसाठी रासाका कृती बचाव समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : कारखाना सुरू करण्याची निविदा काढण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील रासाका साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निविदा काढावी आणि कारखाना सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याप्रमुख मागणीसाठी रासाका कृती बचाव समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. निफाड तालुक्यातील निसाका आठ वर्ष, तर रासाका तीन वर्षांपासून बंद आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान कारखान्याचे भांडवल वापरले जाते सर्वच उमेदवार दोन्ही कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देतात, मात्र तांत्रिक अडचण आणि कोटी रुपयांचे कर्ज यामुळे कारखाना वर्षानुवर्षे बंद आहे.कारखाना सुरू होण्यासाठी अनेक वेळा शासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. मात्र यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, त्यामुळे अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. निफाड तालुक्यातील निसाका आणि रासाका बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परवड होत आहे. नगर जिल्ह्यातील कारखान्याना ऊस द्यावा लागतो. ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. रासाका बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना सुरू व्हावा यासाठी उपोषणास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपोषणकर्त्यांची मर्यादा घालून दिली आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या मागण्या मंत्रालयस्तरावरील असल्यामुळे शासन दरबारी निवेदन आणि माहिती पाठविणार असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले.मात्र जोपर्यंत कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासन निविदा काढत नाही. तो पर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष धोंडीराम रायते, विकास रायते, दत्तू मुरकुटे, राजेंद्र मोगल, सुयोग गिते अनिरुद्ध पवार, शिवराज थेटे, सचिन वाघ, हेमंत सानप, बाबूराव सानप, हर्षल काळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेStrikeसंप