शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ वृक्षांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:32 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.

इंदिरानगर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.  उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात. वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्ष मित्रमंडळाची स्थापना केली. त्याकाळी बापू बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिक केरकचरा टाकत असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. या मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला अन् त्यासाठी सापुतारा, ब्रह्मगिरी यांसारख्या जिल्ह्यातील विविध जंगले व डोंगर दऱ्यातून दुर्मिळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून आज वृक्ष मोठे झाले आहेत. या वृक्षांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या बुंध्याजवळ चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षाची माहिती लिहिण्यात आली होती त्यामुळे आबालवृद्धांना त्यांची ओळख होत होती. परंतु आता सदर चबुतरे हटविण्यात आल्याने दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या उद्यानाची योग्य निगा राखण्याबरोबरच त्यांची ओळख करून देणारे माहिती फलक लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :forestजंगल