शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:00 IST

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.या गावात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिलावर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावाला तात्काळ टँकर मंजूर केला जावा अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.चालू वर्षी संपूर्ण तालुक्याभरात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यामुळे तळाला गेल्या असून या गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी ह्या गावाचीही पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर तसेच गावातील कूपनलिका ह्या पूर्णपणे आटल्याने या गावापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात रहाणारे बहुतांश नागरिक हे शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला सध्यस्थीतीत आपली रोजीरोटी बुडवुन हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षापासुन या गावाला चालू असलेला टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून गावाला सद्यस्थितीत पाणीटचांईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षापासुन बंद झालेला टँकंर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीला करावी लागली असून ग्रामपचांयतीच्या वतीने बागलाण पचांयत समितीकडे टँकंर मागणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजुर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे गावासाठी दहा वर्षांपासून चालू असलेला टँकर बंद झाला होता.गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असुन या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहीरीच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय उरलेला नाही. या करीता शासनाने वेळीच सहानुभुतीपुर्वक विचार करुन गावासाठी पाण्याचे टँकर चालुकरावे लागत आहे.