शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:08 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कोरोना लाटेमध्ये ग्रामीण भागातील काही गाव-पाड्यांनी कोरोनाला वेशीवरच थोपवले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट प्रचंड तीव्र असल्याने त्याचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देलसीकरण वाढविण्याची गरज

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कोरोना लाटेमध्ये ग्रामीण भागातील काही गाव-पाड्यांनी कोरोनाला वेशीवरच थोपवले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट प्रचंड तीव्र असल्याने त्याचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.गेल्या कोरोना लाटेतील कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात पुरेसा झाला नव्हता. तरीसुद्धा ग्रामप्रशासनाकडून सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्क, गाव पाड्यात प्रत्येक घरात वाटप केले गेले. त्यानंतर गावा-गावात बॅनर लावून कोरोनाची जनजागृती झाली. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना कुठेच जनजागृती किंवा मास्क, सॅनिटायझर वाटप होताना दिसत नाही. ग्रामपंचयातींकडूनही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.सुरुवातीला आलेला कोरोना प्रशासनाने विविध उपाययोजनेने आटोक्यात आणला. शहरात वाढत असलेला संसर्ग ग्रामीण भागात काहीसा कमी होता. टाळेबंदीच्या काळात संपूर्ण गावच्या गाव सील केल्यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला. मात्र, आता कोरोनाच्या ओसरलेल्या लाटेनंतर गाव,पाड्यातील नागरिक उदरनिर्वाहासाठी शहरात जात असल्यामुळे तेथील कोरोना गाव, खेड्यापाडयापर्यंत येऊन पोहचला आहे.ह्य ब्रेक दी चेन ह्ण या मोहिमेंतर्गत शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, इतर काही दिवस शिथिल असल्यामुळे नागरिकांची रेलचेल होत असल्यामुळे कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊन खेडे, पाडेही हॉटस्पॉट ठरत आहेत.लसीकरण वाढविण्याची गरजग्रामीण भागात लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाला अपेक्षित वेग आलेला नाही. लसीकरणाबाबत नागरिक उदासिन आहेत. काही भागात उत्साह आहे परंतु पुरेशी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागात लसपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य