बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भावली बुद्रूक गावच्या सरपंचपदी रंजना सराई, तर उपसरपंचपदी विनता संदीप इचम यांची बिनविरोध निवड झाली. मनसेचे जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली.इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतीवर तिसऱ्यांदा मनसेचा झेंडा फडकला आहे. दोन्ही पदांसाठी एक एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महाले यांनी घोषित केले.बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थकांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चंदर मधे, लीलाबाई मधे, लक्ष्मण घोडे, सोनाबाई खडके, ग्रामसेवक जगदीश कदम आदि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
भावलीच्या सरपंचपदी रंजना सराई
By admin | Updated: July 25, 2016 23:38 IST