शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचलेखैरे येथे रंगला रानभाजी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:32 IST

इगतपुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे येथे पोषण आहार मास निमित्त विविध उपक्र म राबविण्यात आले. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, ग्रामस्वच्छता, प्रभात फेरी तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या पद्धती यासह विविध उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात आले.

ठळक मुद्दे७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

इगतपुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे येथे पोषण आहार मास निमित्त विविध उपक्र म राबविण्यात आले. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, ग्रामस्वच्छता, प्रभात फेरी तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या पद्धती यासह विविध उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात आले.आरोग्याचे पोषण याचाच एक भाग म्हणून आदिवासी दुर्गम भागातील रानभाज्या व सेंद्रिय पद्धतीने आहाराचे मानवी शरीरासाठी होणारे फायदे जाणून घेणे व त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेणे यासाठी चिंचलेखैरे येथे शाळेमध्ये रानभाजी महोत्सव विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला. यामध्ये पाच विद्यार्थ्यांचे स्टॉल करून मांडणी केली. यात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी इगतपुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून खास करून या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांनी भेट दिली आणि प्रत्यक्ष रान भाज्यांचा आस्वाद घेतला आगळावेगळा अनुभव व निसर्गाच्या सहवासात जाऊन लहान मुलांमधील लहान होण्याचा आनंद या विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.प्रतिक्रि या---भाजीपाल्यातील रासायनिक पदार्थांच्या सेवनामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे.वाढत्या आजारांमुळे सेंद्रिय आहार काळाची गरज बनली आहे.शाळेने राबविलेला उपक्र म कौतुकास पात्र आहे.- रमेशसिंह परदेशी,अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ.शाळेत बालवयापासुन रानभाज्या व सेंद्रिय भाजीपालाचे महत्व समजाऊन दिल्यास आरोग्यास उपयोग होईल हे धोरण ठेवून शाळेत हा उपक्र म राबविला जात आहे याला पालक विद्यार्थी व समाज चांगला प्रतिसाद देत आहेत- निवृत्ती तळपाडे, मुख्याध्यापक.(फोटो २६ रानभाजी, २६ रानभाजी १)