अंदरसूल : येवला तालुक्यातील रस्ता सुरेगाव जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रातून उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात येणार असून, २६ जानेवारी रोजी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करून गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब मगर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन चव्हाण, सदस्य कचरू गाडेकर, सदस्य फारूक शहा, ग्रामपंचायत सदस्य सचिन मगर आदी उपस्थित होते.
रस्ता सुरेगाव शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 22:58 IST