शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा तासांचा असणार रमजानचा ‘रोजा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:37 IST

यंदाचे रमजान पर्व चालू महिन्याच्या पंधरवड्यात आल्याने उन्हाची तीव्रता जरी असली तरी समाजबांधवांमध्ये रमजानचा उत्साह अधिक जाणवत आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या ‘रमजान मुबारक’च्या संदेशांद्वारे रमजानची चाहूल लागली आहे.

नाशिक : यंदाचे रमजान पर्व चालू महिन्याच्या पंधरवड्यात आल्याने उन्हाची तीव्रता जरी असली तरी समाजबांधवांमध्ये रमजानचा उत्साह अधिक जाणवत आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या ‘रमजान मुबारक’च्या संदेशांद्वारे रमजानची चाहूल लागली आहे.  इस्लामी कालगणनेतील ‘रमजानुल मुबारक’ हा एक महिना असून, हा संपूर्ण महिना निर्जळी उपवासांचा (रोजा) महिना म्हणून ओळखला जातो. रमजानमध्ये धार्मिक कार्यावर अधिकाधिक भर समाजबांधवांकडून दिला जातो. रमजान पर्वाच्या दृष्टीने मुस्लीम बांधवांकडून तयारी केली जात आहे. उपवासांचे नियोजन असलेल्या वेळापत्रकांचे वाटप विविध मशिदींमधून गेल्या शुक्रवारी करण्यात आले. यावर्षी रमजान पर्वाला मेच्या पंधरवड्यातच सुरुवात होत असल्याने निम्मे पर्व उन्हाळ्यात संपणार आहे. धार्मिकदृष्ट्या रमजान पर्वाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात समाजबांधवांकडून धार्मिक कार्यावर मोठा भर दिला जातो. यामुळे पहाटेपासून तर रात्रीपर्यंत मशिदींमध्ये वर्दळ पाहावयास मिळते. त्यामुळे मशिदींमधील व्यवस्था व सोयीसुविधा अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. बैठकव्यवस्थेपासून ध्वनी, वीज, पाणी व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळांकडून होत आहे.स्वतंत्र धर्मगुरूंची नियुक्तीरमजान पर्वामध्ये दररोज रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्याची प्रथा आहे. या नमाजपठणादरम्यान संपूर्ण कुराण मुखोद्गतरीत्या पठण केला जातो. महिनाभरात कुराणपठण यादरम्यान पूर्ण केले जाते. यासाठी ज्या धर्मगुरूंचे कुराण मुखोद्गत आहे, अशा धर्मगुरूंची (हाफिज)अतिरिक्त धर्मगुरू म्हणून मशिदींमध्ये स्वतंत्ररीत्या नियुक्ती केली जात आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम