शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर कोसळली दरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:18 IST

घोटी : जोरदार पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली.

घोटी : जोरदार पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. यासह मोठ्या प्रमाणावर डोंगरावरील पाण्याचा प्रवाह आतमध्ये घुसला. या घटनेत प्रकल्पात उभी असलेली वाहने वाहून गेल्याचे समजते. काही वाहने चेंबली असल्याचेही कळते. प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. येथील पोलीस आणि सुरक्षारक्षकांसह अन्य व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन पोलिसांच्या रायफली पाण्यात वाहून गेल्या आहेत. चार दुचाक्याही वाहून गेल्या आहेत. कामगारांना सेवा देणारे मोठे वाहन मध्ये अडकले आहे. वीजनिर्मिती केंद्राकडे जाणाºया रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने रस्ता बंद झाला आहे. विजनिर्मितीचे काम थांबवण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे आदी अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.घोटीपासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. धरणाच्या पाण्याच्या वापरातून वीज निर्मिती येथे करण्यात येते. हा जलविद्युत प्रकल्प डोंगराच्या कडेला आहे. बुधवारी रात्री पासून या परिसरात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे डोंगरावरील मोठ्या प्रमाणावरील एक दरडीचा भाग थेट जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळला. यात दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या. पोलिसांच्या दोन रायफली आणि चार दुचाकी वाहून गेल्या आहेत. यासोबत जोरदार पाण्याचा लोंढा प्रकल्पावर सुरू झाला. यामध्ये दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहे. अचानक झालेली घटना घडताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.

टॅग्स :Nashikनाशिक