शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रहाटपाळण्यावरून राडा लिलावादरम्यान धक्काबुक्की : दोहोंच्या वादात महापालिकेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:04 IST

नाशिक : नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात हॉटेल संदीप समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत रहाटपाळण्याचा ठेका देण्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या लिलावादरम्यान ठेकेदारांमध्ये राडा झाला. लिलावाच्या बोलीत सहभागी होणाºया ठेकेदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. लिलावात बोली बोलण्याच्या वादात महापालिकेला मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट जास्त महसूल प्राप्त झाला.नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात दरवर्षी महापालिकेमार्फत हॉटेल ...

नाशिक : नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात हॉटेल संदीप समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत रहाटपाळण्याचा ठेका देण्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या लिलावादरम्यान ठेकेदारांमध्ये राडा झाला. लिलावाच्या बोलीत सहभागी होणाºया ठेकेदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. लिलावात बोली बोलण्याच्या वादात महापालिकेला मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट जास्त महसूल प्राप्त झाला.नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात दरवर्षी महापालिकेमार्फत हॉटेल संदीप समोरील मोकळ्या जागेत रहाटपाळण्यांसह आदी मनोरंजनपर खेळ उभारण्यासाठी ठेका दिला जात असतो. शुक्रवारी (दि. १५) महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये सकाळी लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिकेने ३ लाख ९० हजार रुपयांपासून सुरुवात केली. या लिलावप्रक्रियेत १८ ठेकेदार सहभागी झाले होते. त्यात ठेकेदार दीपक डोके यांनी बोलीप्रक्रियेत दरवेळी शंभर रुपयांनी वाढ करण्यास सुरुवात केली. प्रतिस्पर्धी ठेकेदाराने सदर लिलाव प्रतिष्ठेचा करत बोली दहा लाखांपर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यान, डोके यांच्याच विनंतीवरून दहा मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला आणि या ब्रेकमध्येच राडा झाला. दीपक डोके यांना बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली; मात्र बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. यावेळी, काही कार्यकर्त्यांकडे शस्त्रेही असल्याचे सांगितले जाते. धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा लिलावप्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी मुंबई नाका मित्रमंडळाचे संदीप विधाते यांनी सदर ठेका १३ लाख ५ हजार ५०० रुपयांना घेतला. त्यावर २ लाख ३४ हजार ८९० रुपये जीएसटी लागून सदर ठेका हा १५ लाख ४० हजार ४९० रुपयांना गेला. मागील वर्षी हाच ठेका ३ लाख ५७ हजार रुपयांना गेला होता; परंतु यंदा ठेकेदारांच्या वादात महापालिकेची चांदी झाली आणि रहाटपाळण्याने मनपाच्या खजिन्यात पाचपट रक्कम जास्त पडली.