लाड जागृती महिला मंडळातर्फे रॅम्प वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:55 PM2020-02-02T22:55:07+5:302020-02-03T00:23:38+5:30
लाड जागृती महिला मंडळातर्फे महिलांसाठी रॅम्प वॉक व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. अनोख्या पध्दतीने रॅम्प वॉकचे सादरीकरण झाले.
मालेगाव : लाड जागृती महिला मंडळातर्फे रॅम्प वॉक व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.
अनोख्या पध्दतीने रॅम्प वॉकचे सादरीकरण झाले. ‘देश मेरा रंगिला’ या ग्रुपने राष्ट्रीय एकात्मता साधून विविध धर्मा, प्रांताप्रमाणे वेशभूषा करून एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न केला. रॅम्प वॉकचा शेवट संविधानाचे प्रास्ताविक वाचून वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. स्पर्धेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ३ व रॅम्प वॉकमध्ये ५ याप्रमाणे बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंकी मेहता उपस्थित होत्या. मेहता यांनी मार्गदर्शन केले. स्नेहलता नेरकर यांचेही भाषण झाले. परीक्षक म्हणून डॉ. उषाश्री बागड, माधवी पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमास सविता पिंगळे, वर्षा कोतकर, दीपाली टिपरे, शुभांगी महालपुरे, सोनाली कोतकर, वर्षा येवले, वर्षा धूळकर, सुवर्णा तारे, संगीता सोनजे, सुकन्या महालपुरे, रूपाली मुसळे आदी उपस्थित होते. संविधानाचे प्रास्ताविकाचे वाचन अवंती वाणी यांनी केले.