शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:34 IST

नाशिक : राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. गुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गांधीनगर आर्टिलरी एव्हीएशनमध्ये राष्टÑपतींच्या हस्ते फ्लॅग प्रदान हा मुख्य सोहळा होणार आहे.

ठळक मुद्देशहरात मुक्काम : आर्टिलरी येथे आज फ्लॅग प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. गुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गांधीनगर आर्टिलरी एव्हीएशनमध्ये राष्टÑपतींच्या हस्ते फ्लॅग प्रदान हा मुख्य सोहळा होणार आहे.आपल्या दोन दिवसांच्या दौºयात राष्टÑपती शासकीय विश्रामगृहात रात्री मुक्कामास असून, गुरुवारी सकाळी ९ वाजता आर्टिलरी सेंटर येथे फ्लॅग प्रदान सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. सैन्य दलातील वैमानिक घडविण्याचे प्रशिक्षण देणारे आर्टिलरी कॅट हे देशातील सर्वात जुने आणि मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. युद्धजन्य परिस्थितीत लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. या केंद्रातील वैमानिकांनी देशातील अनेक युद्धात दिलेल्या योगदानाबद्दल या केंद्राला राष्टÑपतींच्या हस्ते विशिष्ट ध्वज प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर येथूनच १० किलोमीटर अंतरावरील आर्टिलरी तोफ रेंज परिसरात उभारण्यात आलेल्या ‘रुद्रनाद’ संग्रहालयाचे उद्घाटन राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी ते पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे पोहोचणार आहेत. गुरुवारी दुपारनंतर ते ओझर विमानतळावरून विमानाने दिल्लीला रवाना होतील.तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता राष्टÑपतींचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. ओझर येथून द्वारका मार्गे ते रात्री आठ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात पोहोचले. शासकीय विश्रामगृहाला संपूर्ण सुरक्षिततेचा वेढा असून, केंद्रीय सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विश्रामगृहात त्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNashikनाशिक