शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:42 IST

माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.

नाशिक : माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.  दरवर्षी माघ शुद्ध दशमीला गोदावरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हा जन्मोत्सव श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो. गंगा-गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाच्या वतीने रामकुंडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी (दि.२४) सप्तमीला यज्ञ भूमिपूजन दुपारी पार पडले. दशमीच्या मुहूर्तावर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेदहा ते दुपारपर्यंत गोदा जन्माचे कीर्तन व विश्वकल्याणार्थ पंचदिन जन्मोत्सव महापूजा शिव-पंचायतन महायज्ञ पूजा करण्यात आली. तसेच संध्याकाळी साडेसात वाजता गोदावरी जन्मोत्सवानिमित्त विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेवक हेमलता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, गोदावरी सेवा समितीचे देवांग जानी, गोदाप्रेमी राजेश पंडित आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते पुरोहित अतुल गायधनी, वैभव दीक्षित, मधुकर दीक्षित यांनी गणपती व गोदा आरतीचे पठण केले. गोदावरी नदीची स्वच्छता कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे गोदा प्रदूषणमुक्तीसाठी नाशिककर म्हणून प्रयत्न करावे, असे आवाहन सानप यांनी केले. महाआरतीप्रसंगी संपूर्ण रामकुं डाभोवती शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर उजळला होता. तसेच गंगा-गोदावरी मंदिरासह रामकुंडावरील वस्त्रांतरगृह, गांधी ज्योतीवर रोषणाई करण्यात आली होती. यावेळी गोदावरीचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, गोदा जन्मोत्सवानिमित्त शाळकरी मुलांसाठी विविध स्पर्धाही आयोजिण्यात आल्या होत्या. श्रीराम रक्षापासून ते भावगीत-भक्तिगीतांपर्यंत विविध विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. नाशिकचे अस्तित्व व पर्यटनासाठी गोदावरीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे नाशिककरांनी गोदाकाठावर किमान तिच्या वाढदिवसाच्या औचित्यावर तरी हजेरी लावावी, हाच उद्देश होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनन्य दीपोत्सवाची संकल्पना जनतेपर्यंत पोहचविली. एकूण १८00 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.  - देवांग जानी, अध्यक्ष,  गोदावरी नागरी सेवा समिती

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिक