शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

रामघाटावर ‘घडलंय’; महासभेत ‘बिघडलंय’

By admin | Updated: July 18, 2015 00:08 IST

मानापमान नाट्य : भाजपासह पोलिस यंत्रणा व पुरोहित संघावर शरसंधान

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभारंभाला मंगळवारी (दि.१४) ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी रामघाटावर महापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचे रामायण घडल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत सदस्यांचा नूर बिघडला आणि भाजपासह पोलीस यंत्रणा व पुरोहित संघावर सारेच तुटून पडले. मानापमान नाट्यावर सुमारे चार तास चर्चा झडल्यानंतर येत्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये आखाड्यांचा होणारा ध्वजारोहण सोहळा महापालिकेमार्फत दिमाखात साजरा करण्याचा आणि त्याठिकाणी सर्वांना सन्मानाने निमंत्रित करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केला. पुरोहित संघामार्फत आयोजित धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमस्थळी अनेक नगरसेवकांना पोलिसांनी मज्जाव करत त्यांना अपमानास्पद वागणूक मिळण्याचा प्रकार घडला होता. या साऱ्या प्रकाराबाबत मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी महासभेत लक्षवेधी मांडत पुरोहित संघावर आणि पोलिस यंत्रणेवर जोरदार प्रहार केले. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले महापालिकेचे वस्त्रांतरगृह काढून घेण्याची मागणीही कोंबडे यांनी केली. त्यानंतर भाजपावगळता सर्वपक्षीय सदस्यांनी पुरोहित संघासह पोलीस यंत्रणा आणि भाजपावरही तोंडसुख घेतले. विलास शिंदे यांनी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदविला. संदीप लेनकर यांनी भाजपावर हल्ला चढवत सिंहस्थ निधीतही दुजाभाव झाल्याचा आरोप केला. तानाजी जायभावे यांनी त्र्यंबकेश्वरला सन्मानपूर्वक सोहळा होत असताना नाशिकला महापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांना मिळालेल्या वाईट वागणुकीचा निषेध केला. शिवाजी गांगुर्डे यांनी अशा ठिकाणी आपण जाणे टाळावे असा सल्ला देत पोलिसांच्या मुजोरीवर प्रहार केले. रंजना बोराडे, योगिता अहेर, राहुल दिवे, शाहू खैरे, प्रकाश लोंढे, सूर्यकांत लवटे, शिवाजी शहाणे, डी. जी. सूर्यवंशी, ललिता भालेराव, लक्ष्मण जायभावे, शोभा आवारे, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, यशवंत निकुळे, सुधाकर बडगुजर, मनसे गटनेते अनिल मटाले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभागृहनेते सलीम शेख या साऱ्यांनीच झालेली घटना निंदनीय असल्याचे सांगत निषेध नोंदविला आणि सिंंहस्थ पर्वणीकाळात पदाधिकारी व नगरसेवकांचा सन्मान राखला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदर ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन महापालिकेनेच करणे आवश्यक होते. पदाधिकारी व नगरसेवकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याबाबत महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने, प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता होती. मुख्य सोहळ्यात महापौरांना बोलू दिले नाही. नगरसेवकांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. अनेक नगरसेवकांना निमंत्रणच मिळाले नाही. सिंहस्थ कामांसाठी नगरसेवकांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रभागातील निधीवर पाणी सोडले असताना नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याबद्दल सदस्यांनी तिखट शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी झाले ते चुकीचे व निंदनीय असल्याचे सांगत झाले गेले विसरून जाण्याचे आवाहन सदस्यांना केले. येत्या १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा होणार असून तो महापालिकेमार्फत केला जाईल. पर्वणीकाळात नगरसेवकांना ग्रीन पास देण्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यांनी त्यास मान्यता दिली असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)