शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ

By संकेत शुक्ला | Updated: April 20, 2024 00:06 IST

अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.

नाशिक : विविध ढोलपथकांचा जल्लोष... रांगोळीने सजविण्यात आलेले रस्ते... सुवासिनींकडून रथाचे ओवाळून केले जाणारे स्वागत आणि विविध मंडळांसह भाविकांकडून होत असलेल्या रामनामाचा जयघोष अशा वातावरणात सायंकाळी साडेसहा वाजता कामदा एकादशीला काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून पारंपरिक पद्धतीने श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्यात आली.अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या राघवेंद्रबुवांना पांढरा फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार मानकरी रवींद्र दीक्षित, नंदन दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आले. नारळ वाढवून आरती करून हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली. श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन राघवेंद्रबुवा यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर उभे असलेले दोन्ही रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी दुमदुमली होती.रथोत्सवासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार राहुल ढिकले, राजाभाऊ वाजे, महंत भक्तिचरणदास, खासदार हेमंत गोडसे, दशरथ पाटील, लक्ष्मण सावजी, रंजन ठाकरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, गुरुमित बग्गा, डॉ. सुनील ढिकले, शेखर ढिकले, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.गरुड रथाचे रोकडोबा पटांगणात आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला, तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरी पटांगणात आगमन झाले असता या ठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. गरुड रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे तर राम रथ ओढण्याचा मान सरदार रास्ते तालीम संघ व समस्त पाथरवट समाजाकडे होता. गरुड रथाचे सूत्रसंचालन चंदन पूजाधिकारी, तर रामरथाचे सूत्रसंचालन नंदकुमार मुठे यांनी केले.दोन्ही रथ रामकुंडावर आल्यानंतर अभिषेकदोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृतपूजा, पंचामृत अभ्यंगस्नान, अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी भाविकांनादेखील या उत्सवमूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. वर्षातील एकच असा हा दिवस असतो की, यावेळी काळाराम मंदिरात असलेल्या उत्सवमूर्तींना सामान्य नागरिक स्नान घालू शकतो; त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.रथयात्रेत अवतरले सीता, राम अन् हनुमान...रथोत्सवाच्या अनेक ठिकाणी स्वागत होत असताना अनेक ठिकाणी व्यासपीठावर राम, सीता, हनुमान व लक्ष्मण वेशात मुले सजली होती; तर मिरवणुकीतही सीतेसह रामाची वेशभूषा परिधान केलेले कलावंत भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर