येवला : येवल्यात विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) संघर्ष समिती अंतर्गत कोष्टी व स्वकुळ साळी विणकर समाजाच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी रॅलीद्वारे येऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. शासनाने घेतलेल्या निर्णयावर तत्काळ अंमलबजावणी व्हावी, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला शहरासह महाराष्ट्रातील सुमारे ३२५ शहरात एकाचवेळी राज्यव्यापी आंदोलन छेडून राज्य सरकारला निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे- आरक्षण निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्माने व कर्माने विणकर असणाऱ्यांना सहकारी वस्त्रोद्योग संस्थांमधून राखीव जागा द्याव्यात. आर.टी.ई. कायद्यात शिथिल सवलत द्यावी. उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. यासह सहा मागण्या करण्यात आल्या आहेत. यानिवेदनावर देवांगकोष्टी समाज, स्वकुळ साळी एसबीसी संघर्ष विविध विणकर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. दत्तात्रय मुंगीकर, मनोज भागवत, दत्ता नागडेकर, भगवान आचारी, संजय करंजकर, शेखर कांबळे, प्रशांत कोळस, श्याम झोंड, अरुण काळे, श्याम वारोडे, सुभाष साळवे, भाऊ भागवत, शशिकांत गुळस्कर, शरद वारोडे, संजय रोडे, विनोद वाघमारे, रवि हांगे, अमोल पारखे, प्रवीण गवते, रोशन आदमाने, विजय झिरमुठे, विमल आहेर, हिरा वाघुंबरे, कल्पना भगवत, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर )
विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीतर्फे रॅली
By admin | Updated: February 28, 2017 23:50 IST