चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. राजदेरवाडी हे गाव वडबारे गावापासून १२ ते१५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्र्धेचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे.राजदेरवाडी किल्ल्यावर अनेक पर्यटक ट्रॅकिंगसाठी येतात. पर्यटकही सुटीच्या काळात येऊन मनमुराद आनंद लुटतात. शासनाच्या गड-किल्ले संवर्धन व विकास या कार्यक्र मांतर्गत पुरातनदुर्लक्षित असलेल्या राजदेर किल्ल्यावर संवर्धनाची कामे जात आहे. पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी ६० फुटाची शिडी होती. या जागेवर आता ३ फूट रु ंदीचा ७० फुटाचा जिना तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना सहज किल्ल्यावर पोहोचता येते. त्याचबरोबर गडावर येणारी पायवाट, गडवरील पाणीसाठ्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.गड-किल्ले विकास व संवर्धनासाठी शासनाच्या योजनेत राजदेर किल्ल्याचा समावेशकरून वनविभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे.यामध्ये किल्याचा विकास व संवर्धनासाठी कामाचा समावेश करण्यात आला. जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहे. यात ०.४५ बाय ०.६० मापाची ६०० मीटर सीसीटी खोदण्यात आली.येथील उपसरपंच मनोज शिंदे , आमदार डॉ.राहुल अहेर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन व उपवनसंरक्षक एम रामानुजम , जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप चौधरी यांच्याकडे किल्ल्याच्या विकासासंदर्भात मागणी केली होती.दगडीबांध ५००० घनमीटर, ५ गॅबियन बंधारे बांधण्यात आले, तर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तीन व किल्ल्यावरील ३ पाण्याच्या तळ्यांची खोली वाढवून व स्वच्छता करण्यात आली.किल्ल्यावर जाण्यासाठी ३२ चौरस मीटर जिना तयार करण्यात आला आहे. यामुळे अत्यंत दुर्लक्षित असलेला राजदेर किल्लाचा विकास होऊन पर्यटन वाढीसाठी मदत होणार आह.े यासाठी ३१ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:28 IST
चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे.
राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ
ठळक मुद्देशासनाचा निधी प्राप्त झाल्याने पर्यटन स्थळाचा विकास