शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:37 IST

मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद पक्ष स्थापनेच्या वेळी पाठीमागे कोण होते?पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर

नाशिक : मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांनी गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉल येथे आयोजित मेळाव्यात पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज यांनी सांगितले, मला कुणी भेटायला येत नाही, परंतु जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा. महाराष्टÑात असे काम करा, की तुमचे फोटो झळकले पाहिजेत. तुमच्या जागी राज ठाकरे आहे, असे समजून जबाबदारी पार पाडा. पक्ष स्थापनेच्या वेळी माझ्या पाठीमागे कोण होते? परंतु, शिवतीर्थावरील सभेला तुम्ही लोक आला नसता तर माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लागला असता. अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिककरांना राज ठाकरे काय करत होता, याची जाणीव होत असेल.परत यायचे असेल तर...राज यांनी सांगितले, आता पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना परत यायचे आहे. परत यायचे म्हणजे ती काय बस आहे काय? एक हुकली की दुसरी. परत यायचेच असेल तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पुढील आठवड्यात पक्षाचे नेते नाशिकला येतील. त्यावेळी पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर दिला जाईल. गटाध्यक्षांपासून शाखाध्यक्षांपर्यंत नेमणुका केल्या जातील. जे बाहेर गेलेले ते तळाला जातील. मला कुणाची गरज नाही, असेही राज यांनी सुनावले.कुठे गेले नमोरुग्ण?राज यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले. भाजपाची वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती बघा. कुठे गेले नमोरुग्ण? एक एसएमएस टाकला की ते तुटून पडत होते. आता सिलिंडर, पेट्रोल महाग झाल्याने घरातूनच लाथा बसल्या. जे सांगितले त्याचे प्रत्यक्षात काय झाले? किती वेळ थापा मारणार, असे सांगत राज यांनी महापालिकेतील भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचे आदेश दिले.भविष्यात मी पक्ष काढेल, असे मला माहीत नव्हते. राजकारणात मी अपघाताने आलो. कॉलेजमध्ये असताना मला अमेरिकेतील वर्ल्ड स्टुडिओत जाऊन अ‍ॅनिमेटर व्हायचे होते. परंतु, त्यावेळी तेथे पोहोचण्याचे माध्यम नव्हते. तेथूनच राजकीय व्यंगचित्रकला सुरू केली. मनात राजकीय विचार करण्याची तयारी होतीच. पुढे जे घडत गेले ते तुम्हाला माहिती आहे, असेही राज यांनी सांगितले.