शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात

By संकेत शुक्ला | Updated: February 1, 2024 16:39 IST

दोन दिवसांचा दौरा : कार्यकर्ता शिबिरात घेतला कामकाजाचा आढावा

नाशिक : शाखाप्रमुख म्हणून तुमचे कामकाज कसे असावे... तालुकास्तरावर काम करताना तुमचा आवाका काय हवा... जिल्हास्तरावरून कामकाजाचे नियोजन कसे हवे, याबरोबरच नाशिककरांनी मनसेला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा, राजकीय भांडणात आपल्याला संधी आहे, पुन्हा एकदा नाशिक जिंकण्यासाठी कामाला लागा, असे डोस मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. विशेष म्हणजे एरवी माध्यमांसमोर बिनधास्त बोलणाऱ्या ठाकरे यांनी मेळाव्यात मात्र माध्यमांना दूर सारत बंद दाराआड हे डोस दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये ‘हॉटेल एक्स्प्रेस इन’ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुवारी दुपारी ढोल-ताशांच्या गजरात राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, रोहन देशपांडे, सुजाता डेरे, स्वागता उपासणी, सत्यम खंडाळे यांसह पदाधिकारी उपस्थित होेते. पहिल्या टप्प्यात राज यांनी शहरातील शाखाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. शेवटी जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी व्यूहरचना कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. अमित ठाकरे घालणार नाशिकमध्ये लक्षमनसेवर नाशिककरांनी विश्वास दाखवला आहे. सन २०१२ ते १७ या कालावधीत मनसेने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. याच नाशिकमधून त्यांना तीन आमदारही मिळाले होते. ‘विकासाची ब्लू प्रिंट’ म्हणून नाशिकचा उल्लेख राज यांनी ठिकठिकाणी केला आहे. नाशिककर आपल्याला साथ देतात हा विश्वास राज यांना असल्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांना नाशिकमध्ये विशेष जबाबदारी सोपविल्याची चर्चा होती.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे