शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पावसाच्या उघडिपीमुळे खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

ठळक मुद्देरब्बीची तयारी सुरू : पाच तालुक्यांमध्ये पेरण्या शिल्लक

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्यागतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढली असून, त्यांना पुरेशा पाण्याची वेळ आलेली असताना गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली आहेत. विशेष करून बाजरी, मका, भात व सोयाबीन या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत.जिल्ह्णात यंदा आॅगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून, गतवर्षाच्या तुलनेत ४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्यानाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यापैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.हेक्टर व टक्केवारीमालेगाव- ८५२७० (१३१.१४)बागलाण- ६७६२८ (१८३.५३)कळवण- ४३४९७ (७९.०१)देवळा- २५४२५ (९६.३५)नांदगाव- ६७७९६ (९५.३५)सुरगाणा- २०८०७ (६९.३१)नाशिक - १००८२ (६४.६७)त्र्यंबकेश्वर- २२७११ (१३६.०६)दिंडोरी- १८५९४ (१११.४०)इगतपुरी- २९७४३ (८४.२४)पेठ- १५७२२ (६४.०९)निफाड- २२२७८ (९०.०२)सिन्नर- ६५४९३ (१०५.९७)येवला- ७१३२४ (१४२.१७)चांदवड- ३७६६७ (८२.५७)